महाराष्ट्रतील पाणी प्रशन
महाराष्ट्रातील पाणी नियोजन
महाराष्ट्रात पाऊस बेभरवशाचा झाला आहे. तो वेळेवर सुरू न झाल्याने जून महिन्यामध्ये पाण्याची टंचाई भासते; तर ब-याचदा तो लवकर माघारी परतल्याने तलावातील पाणी पावसाळी हंगामातच कमी होते. यावर प्रभावी उपाय म्हणजे तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जलसंवर्धनाची कामे प्राधान्याने हाती घेणे. . अनेक ठिकाणी पाण्याचे सोत दूषित होत आहेत. पाण्याचे प्रदूषण फक्त कारखाने व शहरांच्या सांडपाण्यातूनच होते असे नाही. दरवषीर् हजारो टन निर्माल्य समुदात, तलावांत, नद्यांतून टाकले जाते. नाशिक, पंढरपूर, वाराणसी अशा ठिकाणी धामिर्क कृत्ये नदीच्या तीरावर केली जातात. त्याकामी अर्पण केलेल्या सर्व गोष्टी उदाहरणार्थ, फुले, पिंड, राख इत्यादी पाण्यातच टाकली जातात. परमेश्वराच्या नावावर पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते हे आपण विसरतो.
शहरातील व गावांचे पाणी वापर
आपण पाणी वापरामध्ये बचत करू शकतो. जसे बादलीत पाणी घेऊन आंघोळ केली तर १८ लिटर पाणी लागते. पण शॉवरखाली आंघोळ केली तर कमीत कमी १०० लिटर पाणी वापरले जाते. नळ सोडून दाढी केली तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेऊन दाढी केली तर तेच काम एक लिटरमध्ये होते. नळ उघडा ठेवून दात ब्रश केले तर १० लिटरमध्ये; पण मगमध्ये पाणी घेऊन दात स्वच्छ केले की, एक लिटरमध्ये काम होऊ शकते. वाहत्या नळाखाली कापडे धुण्यासाठी ११६ लिटर पाणी लागते; तर बादलीचा वापर केला तर ३६ लिटरमध्ये तेच काम होऊ शकते. वॉशिंग मशीनमध्ये तर पाण्याचा बराच अपव्यय होतो. निदान कमीत कमी डिटर्जंटचा वापर करावा. मोटार धुण्यासाठी पाइपचा वापर केला तर १०० लिटर पाणी लागते; परंतु कपडा बादलीत भिजवून कार धुतली तर १८ लिटर पाण्यामध्ये काम होऊ शकते. वाहत्या नळाखाली हात धुतले तर १० लिटर पाणी वापरले जाते; परंतु मगमध्ये पाणी घेऊन हात धुतले तर अर्ध्या लिटरमध्ये काम होऊ शकते. शौचविधीनंतर फ्लशचा वापर केला तर २० लिटर पाणी जाते. परंतु बादलीत पाणी घेऊन त्याचा वापर केला तर सहा लिटरमध्ये काम होऊ शकते. कॉक दाबून पाणी सोडता येण्यासारखी सोय केली तर किंवा मोठा नळ बसवूनही ते काम होऊ शकते. आशा अनेक प्रकारच्या उपाययोजना करू शकतो .

महाराष्ट्रात पाऊस बेभरवशाचा झाला आहे. तो वेळेवर सुरू न झाल्याने जून महिन्यामध्ये पाण्याची टंचाई भासते; तर ब-याचदा तो लवकर माघारी परतल्याने तलावातील पाणी पावसाळी हंगामातच कमी होते. यावर प्रभावी उपाय म्हणजे तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जलसंवर्धनाची कामे प्राधान्याने हाती घेणे. . अनेक ठिकाणी पाण्याचे सोत दूषित होत आहेत. पाण्याचे प्रदूषण फक्त कारखाने व शहरांच्या सांडपाण्यातूनच होते असे नाही. दरवषीर् हजारो टन निर्माल्य समुदात, तलावांत, नद्यांतून टाकले जाते. नाशिक, पंढरपूर, वाराणसी अशा ठिकाणी धामिर्क कृत्ये नदीच्या तीरावर केली जातात. त्याकामी अर्पण केलेल्या सर्व गोष्टी उदाहरणार्थ, फुले, पिंड, राख इत्यादी पाण्यातच टाकली जातात. परमेश्वराच्या नावावर पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते हे आपण विसरतो.
शहरातील व गावांचे पाणी वापर
शहरांतून व गावांतून आता नळ योजनेतून पाणी मिळते. आदल्या दिवशी साठविलेले पाणी शिळे झाले म्हणून दुस-या दिवशी फेकून दिले जाते. खरे तर व्यवस्थित झाकून ठेवल्यास पाणी खराब होत नाही. नळावर येणारे पाणी धरणामध्ये अनेक दिवस साठवलेलेच असते ना? मोठी महापालिका क्षेत्रे वगळल्यास इतर शहरांतून आजही घरांच्या, सोसायट्यांच्या परिसरात मोकळी जागा उपलब्ध असते. ज्या नगरपालिका अथवा नगरपरिषदेच्या क्षेत्रांत भुयारी गटारे नाहीत, अशा ठिकाणी घर किंवा सोसायटीचे बांधकाम करतानाच ड्रेनेज पाईपची विशिष्ट तऱ्हेने रचना केली तर ते सांडपाणी केळी, माडासारख्या झाडांना किंवा बागेपर्यंत पोहोचू शकते. घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे संकलन केले तर निदान काही घरे, सोसायट्या पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकतील.
घरगुती पाणी बचत योजना आपण पाणी वापरामध्ये बचत करू शकतो. जसे बादलीत पाणी घेऊन आंघोळ केली तर १८ लिटर पाणी लागते. पण शॉवरखाली आंघोळ केली तर कमीत कमी १०० लिटर पाणी वापरले जाते. नळ सोडून दाढी केली तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेऊन दाढी केली तर तेच काम एक लिटरमध्ये होते. नळ उघडा ठेवून दात ब्रश केले तर १० लिटरमध्ये; पण मगमध्ये पाणी घेऊन दात स्वच्छ केले की, एक लिटरमध्ये काम होऊ शकते. वाहत्या नळाखाली कापडे धुण्यासाठी ११६ लिटर पाणी लागते; तर बादलीचा वापर केला तर ३६ लिटरमध्ये तेच काम होऊ शकते. वॉशिंग मशीनमध्ये तर पाण्याचा बराच अपव्यय होतो. निदान कमीत कमी डिटर्जंटचा वापर करावा. मोटार धुण्यासाठी पाइपचा वापर केला तर १०० लिटर पाणी लागते; परंतु कपडा बादलीत भिजवून कार धुतली तर १८ लिटर पाण्यामध्ये काम होऊ शकते. वाहत्या नळाखाली हात धुतले तर १० लिटर पाणी वापरले जाते; परंतु मगमध्ये पाणी घेऊन हात धुतले तर अर्ध्या लिटरमध्ये काम होऊ शकते. शौचविधीनंतर फ्लशचा वापर केला तर २० लिटर पाणी जाते. परंतु बादलीत पाणी घेऊन त्याचा वापर केला तर सहा लिटरमध्ये काम होऊ शकते. कॉक दाबून पाणी सोडता येण्यासारखी सोय केली तर किंवा मोठा नळ बसवूनही ते काम होऊ शकते. आशा अनेक प्रकारच्या उपाययोजना करू शकतो .
No comments:
Post a Comment